शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ – Maharashtra State Scholarship
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित ‘प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी)’ व ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)’ ची प्रवेशपत्रे (Admit Cards) परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया : Admit Cards of Scholarship Exam
१. 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://2026-2.puppssmsce.in/ ला भेट द्यावी.
२. 🔑 शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) वापरून लॉगिन करावे.
३. 📄 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.
४. ✒️ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का व स्वाक्षरी करावी.
महत्त्वाच्या सूचना :
१. 🔍 प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, वेळ, सूचना आणि परीक्षार्थ्याची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून योग्य असल्याची खात्री करावी.
२. 🚫 परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.
३. ⏳ तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवेशपत्रे वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत.
मुख्याद्यापक याना पासवर्ड लक्षात नसल्यास Forget Password करावे. पासवर्ड Registered Mobile वर प्राप्त होईल.
अधिकच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (msce pune) च्या
official website
http://www.mscepune.in/ या site ला भेट द्यावी.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : Mahatet Exam Schedule
आवेदन करण्याची तारीख : २७/०३/२०२६ ते १६/०४/२०२६
Notification पाहण्यासाठी खालील Link वर Click करावे