UIT येथे Diploma, BTech साठी प्रवेश प्रक्रिया

UIT येथे Diploma, BTech साठी प्रवेश प्रक्रिया University Institute of Technology (UIT) अडपल्ली हे महाविद्यालय Lloyds Metals आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा संयुक्त उपक्रम आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ ला Polytechnic सुरु करण्यात आलं होतं. या महाविद्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून BTech हा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. भविष्यतील एक प्रतिष्टित महाविद्यालय ठरणार असे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री यांनी केले आहे. गडचिरोली जिल्हा हा टोकावरचा जिल्हा म्हणून ओळखला न जात तो महाराष्ट्राचे प्रवेशद्वार ठरावा असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. Diploma & B. Tech Branches प्रमुख वैशिष्ठ खालील प्रमाणे किंवा Why UIT? Highlights

Read More

UDISE PLUS 2026-27 – STUDENTS PROMOTION

UDISE PLUS – STUDENTS PROMOTION UDISE PLUS २०२६-२७ ची कार्यवाही सुरु झालेली आहे. भारत सरकारने नवीन शैक्षणिक सत्राकरिता परत एकदा UDISE PLUS सुरु केलं आहे. सद्यस्थितीत Students Promotion सुरु झालं आहे. २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र राज्याची SARAL प्रणाली आणि भारत सरकारची UDISE PLUS प्रणालीचे Integration झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने उशिरा का होईना दोन्ही प्रणालींना एकत्र आणलं आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्रम कमी झाले. एकच माहिती दोन वेगवेगळ्या पोर्टलवर भरावी लागायची. एकत्रीकरणामुळे शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एक Strong Database तयार होण्यास मदत झाली आहे. शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये UDISE PLUS मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली त्या विद्यार्थ्यांचा डेटा SARAL प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलमध्ये इम्पोर्ट करण्यात आला. त्याचबरोबर UDISE PLUS च्या स्कूल पोर्टल मधून शाळांची काही महत्त्वाची माहिती SARAL प्रणालीच्या स्कूल पोर्टल आणि संच मान्यता पोर्टलमध्ये इम्पोर्ट करण्यात आली. या दोन्ही पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे द्वारे संच मान्यता 2025 26 जनरेट केली. यशस्वीरित्या ही संच मान्यता जनरेट झालेली आहे. UDISE PLUS मध्ये काही शाळांनी चुका केलेले होत्या. त्यात चुकामुळे SARAL प्रणालीमध्ये डेटा इम्पोर्ट करताना काही अडचणी आल्या. परंतु या सत्रामध्ये UDISE PLUS मध्ये या सर्व अडचणी सोडविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा UDISE PLUS प्रमोशन करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक पद्धतीने विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचं प्रमोशन अचूक झालं की मग New Entry टॅब दिली जाणार आहे. Educate Bharat Youtube Channnel च्या माध्यमातून आणि News4PM या वेबपोर्टलच्या माध्यमातून शाळांना मदत केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांचं प्रमोशन करत असताना काही महत्त्वाच्या सूचना Educate Bharat Youtube Channnel च्या Latest Video माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षकीय यंत्रणेने हा व्हिडिओ पाहून चुका होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बाब स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्या सूचनांचा जर काटेकोरपणे पालन केलं तर याच्या सत्रामध्ये संच मान्यता चुकणार नाही. UDISE PLUS मध्ये AADHAAR VALIDATION आणि APAAR ID हे काम सुद्धा भरीव प्रमाणामध्ये झालेले आहे. या सत्रामध्ये APAAR ID आणि AADHAAR VALIDATION 100% करण्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण मुख्याध्यापक यांना यांनी विद्यार्थ्यांचे AADHAAR अपडेट करावे तसेच विद्यार्थ्यांचे APAAR ID जनरेट करावे असे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Read More

प्रश्न मंजुषा स्पर्धा-General Knowledge Test

खालील लिंक वर क्लिक करा. एक फाइल डाउनलोड होईल तिला ओपन करा म्हणजे आपली QUIZ सुरु होईल Quiz कशी सोडवायची याबाबत सर्व माहिती खाली दिलेल्या video मध्ये सांगितलं आहे. पहा हा Video   https://www.youtube.com/watch?v=naqA8nf5AfM

Read More

TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत ठराव पारित

शिक्षकांसाटी अत्यंत आनंदाची बातमी. शिक्षकांना TET मधून मिळणार शिक्षकांना सूट . लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. संसद सत्राच्या शेवटच्या दिवशी RTE Act 2026 मध्ये मोठा बदल करण्यात आलेला. यामुळे देशातील लाखो शिक्षकाना मोठा दिलासा मिळाला आहे. TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत प्रस्ताव पारित देशातील २५ लाख शिक्षकांना दिलासा देणारी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरणारी आहे. आत्मविश्वास वाढणारी बातमी आहे. भारतीय संसदेत RTE Act २०२६ पारित झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या TET अनिवार्य केले जाये या निर्णयाला संसदेने एकमताने बाजूला सारले आहे. भारतीय संविधानातील एक अत्योच्च तरतुदीमुळे हे शक्य झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे शिक्षक ३१ मार्च २०१५ पर्यंत शिक्षकी सेवेत आलेले आहेत. ज्यांनी अद्यापही TET ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही. अशा शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ निर्णयात २ वर्षात या शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले होते. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत आपली नाराजी शासनाकडे जाहीर केली होती. या दोन वर्षात शिक्षकांनी TET ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक होते. जे ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत स्वतःहून सेवेचा राजीनामा द्यावा किव्हा राज्य शासनाने त्यांना स्वेच्छा निवृत्ती द्यावी असा फार मोठा दुरंगामी परिणाम करणारा निर्णय आलेला होता.

Read More

शिष्यवृत्ती परीक्षा २०२६-Maharashtra State Scholarship

Maharashtra State Scholarship : दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित ‘प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ४ थी)’ व ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ७ वी)’ ची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया – Admit Cards of Exam १. 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://2026-2.puppssmsce.in/ ला भेट द्यावी.२. 🔑 शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) वापरून लॉगिन करावे.३. 📄 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.४. ✒️ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का व स्वाक्षरी करावी. Maharashtra State Scholarship : महत्त्वाच्या सूचना : १. 🔍 प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, वेळ, सूचना आणि परीक्षार्थ्याची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून योग्य असल्याची खात्री करावी.२. 🚫 परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.३. ⏳ तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवेशपत्रे वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत. मुख्याद्यापक याना पासवर्ड लक्षात नसल्यास Forget Password करावे. पासवर्ड Registered Mobile वर प्राप्त होईल. शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ – Maharashtra State Scholarship अधिकच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (msce pune) च्याofficial websitehttp://www.mscepune.in/ या site ला भेट द्यावी. Meanwhile …महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : Mahatet Exam Schedule आवेदन करण्याची तारीख : २७/०३/२०२६ ते १६/०४/२०२६ Notification पाहण्यासाठी खालील Link वर Click करावे अधिक माहितीसाठी आपण News4PM च्या Official website https://news4pm.com/ ला भेट द्या आणि संपूर्ण detailed माहिती आपण पाहू शकता. कोणतीही अडचण असल्यास आपण अवश्य Comments करावे. याबाबत उचित मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल. शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक यांच्यासाठीच सादर Web Portal सुरु करण्यात आलेले आहे.

Read More

३३७८ कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

समग्र शिक्षा योजनेतील हजारो कर्मचारी नियमितच्या प्रतीक्षेत प्रकल्पाचे काय? कर्मचाऱ्यांचे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा निर्णय घेणार?

Read More