LMV – HMV Driving प्रशिक्षणाचे आयोजन
LT गोंडवाना आणि LMGSE यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील पुरुष आणि महिलासाठी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. LMV आणि HMV प्रशिक्षणाकरीता शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी आहे. परंतु HMV प्रशिक्षणाकरिता वाहन चालक परवाना आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. बोदली येथे सदर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. माहितीसाठी आणि नोंदणीसाठी दिलेल्या WHATSAPP नंबर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
सदर प्रशिक्षण ३ महिन्यांचे असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे. प्रशिक्षणादरम्यान मोफत भोजन आणि निवासाची सोय असेल. प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल. रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून इच्छूक उमेदवारांनी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर Whatsapp करून अधिकची माहिती जाणून घ्यावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा.