TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत ठराव पारित
शिक्षकांसाटी अत्यंत आनंदाची बातमी. शिक्षकांना TET मधून मिळणार शिक्षकांना सूट . लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. संसद सत्राच्या शेवटच्या दिवशी RTE Act 2026 मध्ये मोठा बदल करण्यात आलेला. यामुळे देशातील लाखो शिक्षकाना मोठा दिलासा मिळाला आहे.

TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत प्रस्ताव पारित
देशातील २५ लाख शिक्षकांना दिलासा देणारी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरणारी आहे. आत्मविश्वास वाढणारी बातमी आहे. भारतीय संसदेत RTE Act २०२६ पारित झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या TET अनिवार्य केले जाये या निर्णयाला संसदेने एकमताने बाजूला सारले आहे. भारतीय संविधानातील एक अत्योच्च तरतुदीमुळे हे शक्य झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे शिक्षक ३१ मार्च २०१५ पर्यंत शिक्षकी सेवेत आलेले आहेत. ज्यांनी अद्यापही TET ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही. अशा शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ निर्णयात २ वर्षात या शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले होते. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत आपली नाराजी शासनाकडे जाहीर केली होती. या दोन वर्षात शिक्षकांनी TET ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक होते. जे ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत स्वतःहून सेवेचा राजीनामा द्यावा किव्हा राज्य शासनाने त्यांना स्वेच्छा निवृत्ती द्यावी असा फार मोठा दुरंगामी परिणाम करणारा निर्णय आलेला होता.