UDISE PLUS 2026-27 – STUDENTS PROMOTION
UDISE PLUS – STUDENTS PROMOTION
UDISE PLUS २०२६-२७ ची कार्यवाही सुरु झालेली आहे. भारत सरकारने नवीन शैक्षणिक सत्राकरिता परत एकदा UDISE PLUS सुरु केलं आहे. सद्यस्थितीत Students Promotion सुरु झालं आहे. २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र राज्याची SARAL प्रणाली आणि भारत सरकारची UDISE PLUS प्रणालीचे Integration झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने उशिरा का होईना दोन्ही प्रणालींना एकत्र आणलं आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्रम कमी झाले. एकच माहिती दोन वेगवेगळ्या पोर्टलवर भरावी लागायची. एकत्रीकरणामुळे शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एक Strong Database तयार होण्यास मदत झाली आहे.
शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये UDISE PLUS मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली त्या विद्यार्थ्यांचा डेटा SARAL प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलमध्ये इम्पोर्ट करण्यात आला. त्याचबरोबर UDISE PLUS च्या स्कूल पोर्टल मधून शाळांची काही महत्त्वाची माहिती SARAL प्रणालीच्या स्कूल पोर्टल आणि संच मान्यता पोर्टलमध्ये इम्पोर्ट करण्यात आली. या दोन्ही पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे द्वारे संच मान्यता 2025 26 जनरेट केली. यशस्वीरित्या ही संच मान्यता जनरेट झालेली आहे. UDISE PLUS मध्ये काही शाळांनी चुका केलेले होत्या. त्यात चुकामुळे SARAL प्रणालीमध्ये डेटा इम्पोर्ट करताना काही अडचणी आल्या. परंतु या सत्रामध्ये UDISE PLUS मध्ये या सर्व अडचणी सोडविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा UDISE PLUS प्रमोशन करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक पद्धतीने विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचं प्रमोशन अचूक झालं की मग New Entry टॅब दिली जाणार आहे. Educate Bharat Youtube Channnel च्या माध्यमातून आणि News4PM या वेबपोर्टलच्या माध्यमातून शाळांना मदत केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांचं प्रमोशन करत असताना काही महत्त्वाच्या सूचना Educate Bharat Youtube Channnel च्या Latest Video माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षकीय यंत्रणेने हा व्हिडिओ पाहून चुका होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बाब स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्या सूचनांचा जर काटेकोरपणे पालन केलं तर याच्या सत्रामध्ये संच मान्यता चुकणार नाही. UDISE PLUS मध्ये AADHAAR VALIDATION आणि APAAR ID हे काम सुद्धा भरीव प्रमाणामध्ये झालेले आहे. या सत्रामध्ये APAAR ID आणि AADHAAR VALIDATION 100% करण्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण मुख्याध्यापक यांना यांनी विद्यार्थ्यांचे AADHAAR अपडेट करावे तसेच विद्यार्थ्यांचे APAAR ID जनरेट करावे असे असे आवाहन करण्यात आलेले आहे.