UPSC Topper Rajat Walke –  गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !

UPSC Topper Rajat Walke – गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !

UPSC २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या निकालात रजत वाळके या तरुण अभियंत्याचे नाव झळकले. ९५८ उमेदवारांची आयोगाने निवड केली आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल ५९ तरुण तरुणींची निवड झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील एका अभियंत्याने ही परीक्षा दमदार पद्धतीने उत्तीर्ण करून जिल्ह्यातील तरुणांना एक आदर्श प्रस्थापित केला आहे. UPSC परीक्षेत ५१४ वी रँक मिळवून राज्याचे नाव मोठे केले आहे. हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातच पूर्ण केल्यानंतर JEE सारखी अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून रजत याने NIT नागपूर येथून संगणक शास्त्रातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर साहजिकच अनेक नामांकित भारतीय किंव्हा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला नोकरी करता आली असती. पण त्याचे ध्येय वेगळे होते आणि नोकरी करण्यापेक्षा केंद्रीय नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो तयारीला लागला. रजतच्या वडिलांचेही स्वप्न होते आपल्या कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे. वडिलांचे ते स्वप्न रजतने पूर्ण केले आहे. पण ते यश पाहण्यासाठी आणि आपले पूर्ण झालेले स्वप्न डोळ्यांनी बघण्याचे भाग्य मात्र त्याच्या वडिलांना लाभले नाही. अत्त दिप भव! या तथागत भगवान बुद्धांच्या निर्वाणीच्या संदेशनुसार काहीही अशक्य नाही हे रजतने सिद्ध करून दाखवले आहे. आज खऱ्या अर्थाने गडचिरोली जिल्हा गौरानन्वित झाला आहे. येणाऱ्या तरुणांना राजतच्या रूपाने एक मार्गदर्शक दिपस्थान प्राप्त झाले आहे. इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही हे रजतने सिद्ध केले आहे. कुटुंब प्रमुख वडील हयात नसतानाही खचून न जाता त्याने विजयश्री खेचून आणली आहे. एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वत्र त्याच्या यशाचे कौतुक केले जात आहे. “Dream Big and Start Today” हा अत्यंत मौलिक संदेश त्यांनी तरुणांना दिला आहे. “जेवढे तुमचे मोठे स्वप्न राहतील तेवढे तुमचे प्रयत्न राहतील. जेवढे शक्य असेल तेवढ्या लवकर स्वतःला यासाठी झोकून द्यावे”. असा संदेश दिला आहे. रजतच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तरुणांनी आपले लक्ष विचलित न करता शिक्षण आणि ज्ञानावर लक्ष घालावे आणि आपले स्वप्न पूर्ण करावे अशा news4pm.com कडून शुभेच्छा!

Visit for UPSC Exam

Best IAS Books Recommended for UPSC Civil Service Examination

JEE Advanced 2026 Preparation Strategy

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *