केंद्रीय निवडणूक आयुक्तांवर महाभियोग येणार – १९३ खासदारांची सही
केंद्रीय निवडणूक आयुक्तांवर महाभियोग येणार – १९३ खासदारांची सही
भारतीय इतिहासात जे घडलं नाही हे कदाचित पहिल्यांदा भारतात घडणार असल्याचे एकूणच वातावरण आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३२४ (५) [Article 324(5)] हे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) स्वातंत्र्याशी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) पदावरून हटवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. या संदर्भात विरोधी पक्षाच्या १९३ खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. यात लोकसभेच्या १३० खासदारांनी आणि ६३ राज्यसभेच्या खासदारांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३२४ [Article 324] हे निवडणूक आयोगाच्या निर्मितीशी संबंधित आहे. भारतीय निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असून ती निष्पक्ष असावी असे संविधानात अभिप्रेत आहे. परंतु निवडणूक आयोग निष्पक्ष काम करीत नसल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात महाभियोग आणणार असल्याची चर्चा आहे. सर्व साधारणपणे लोकसभेत हा प्रस्ताव सादर करायचा असेल तर लोकसभेच्या १०० खासदारांची स्वाक्षरी असावी लागते. प्रस्ताव जर राज्यसभेत सादर करायचा असेल तर ५० राज्यसभा खासदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या सभागृहात हा प्रस्ताव सादर केला जाईल हे गोपनीय आहे आणि लवकरच ते माहिती होईल आणि जनता ते जाणण्यास इच्छुक आहेत. निवडणूक आयोगाला आता अस्तित्वात असलेल्या सरकारने निवडणूक आयुक्ताला पूर्ण सरंक्षण दिले असून ते पदावर असतांना किव्हा पदावर नसतांनाही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही अशी तरतूद केली असल्याने निवडणूक आयुक्त हे सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप आहे. SIR च्या नावावर नागरिकांचे मत कापण्याचे काम करीत असल्याचंही आरोप केला आहे. ही एक प्रक्रिया असून यात खूप वेळ लागणार आहे. सरकार या कामातही वेळ काढूपणा करेल अशी विरोधी पार्टीचे म्हणणं आहे. भारतीय संविधानानुसार कोणालाही ही अशा प्रकारची सुविधा कोणालाच नसून फक्त निवडणूक आयुक्तांना ही सुविधा दिल्याने भारतीय निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत अशी मागणी विरोधी पक्षाची असून हे काम असंवैधानिक असल्याची देशात चर्चा आहे. विरोधी पार्टीच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार आहे. निश्चितच भारतीय इतिहासात कधीच हे घडले नसून इतर पक्षाचे खासदार याबाबत काय निर्णय घेतील आणि हा महाभियोग मंजूर होईल की नाही हे पाहायला मिळणार आहे.
Author : new4pm